श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव महिन्याभरानंतर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:40 AM2019-12-22T00:40:53+5:302019-12-22T00:41:24+5:30
हिरावाडीतील महापालिका क्रीडा संकुललगत मनपाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे जलतरण तलावाला टाळे ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने कमी दाबाने पाणीपुरवठा केली जाणारी जोडणी बंद करून नवीन जलवाहिनीतून जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने बंद असलेला तलाव पुन्हा सुरू झाला आहे.
पंचवटी : हिरावाडीतील महापालिका क्रीडा संकुललगत मनपाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बंद होता. त्यामुळे जलतरण तलावाला टाळे ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने कमी दाबाने पाणीपुरवठा केली जाणारी जोडणी बंद करून नवीन जलवाहिनीतून जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने बंद असलेला तलाव पुन्हा सुरू झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून बंद असलेला जलतरण तलाव पुनश्च सुरू झाल्याने तलावात पोहण्यासाठी येणाºया परिसरातील शेकडो जलतरणपटूंनी समाधान व्यक्त केले आहे. जलतरण तलावात दैनंदिन पाणी फिल्टरेशन करण्यासाठी पाणी कमी पडत असल्याने प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती म्हणून जलतरण तलाव अनिश्चित काळासाठी बंद ठेवला होता. त्यामुळे दैनंदिन पोहण्यासाठी येणाºया शेकडो जलतरणपटूंची बोळवण होत होती. अपुºया पाणीपुरवठ्यामुळे नोव्हेंबरमध्ये जलतरण तलाव अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्याचा फलक प्रवेशद्वारावर लावला होता. तलावात पाणी शुद्ध रहावे म्हणून दैनंदिन पाणी फिल्टर करावे लागते. काही दिवसांपासून तलावात कमी पाणीपुरवठा होत असल्यामुळे फिल्टरेशनला पाणी अपुरे पडत होते त्यामुळे दर दोन दिवसांनी पाणी फिल्टर करावे लागायचे. तलावात पाणी खराब राहत असल्याने जलतरणपटू तक्र ार करायचे. प्रशासनाने तलावात जास्त पाणी उपलब्ध करून नवी नळजोडणी करावी यासाठी मनपाकडे पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासन कधी बांधकाम तर कधी पाणीपुरवठ्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायचे. त्यामुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाºया जलतरणपटूंची गैरसोय झाली होती.
याबाबत काही दिवसांपूर्वी दैनिक लोकमतमध्ये जलतरण तलाव बंद असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मनपा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन जलतरण तलावाला होणाºया जुन्या जलवाहिनीची जोडणी बंद करून नव्या जलवाहिनीतून जोडणी करत पाणीपुरवठा सुरळीत केल्याने जलतरण तलाव पुन्हा सुरू झाला आहे.
जलतरण तलावाचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला त्या संबंधित ठेकेदाराचा करार संपलेला आहे. करार संपल्याने नवीन टेंडर काढण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलावात
क्र ीडासंकुलाच्या लगत असलेल्या ठिकाणाहून कूपनलिकेतून पाणी वापरले जायचे, मात्र जुन्या जलवाहिनीतील जोडणी बंद करून नवीन जलवाहिनीतून नळजोडणी केल्याने पाण्याचा दाब वाढला. पंधरवड्यापासून जलतरण तलाव पुनश्च सुरू झाला आहे. आता तरण तलावात भरपूर पाणी मिळत आहे
- आर. एस. पाटील, प्रभारी विभागीय अधिकारी, पंचवटी मनपा