श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:15+5:302021-03-13T04:25:15+5:30

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेला सप्तश्रृंगी गडावरील विविध विकासकामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी ...

Shrikshetra Saptashranggada will be transformed | श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाचा होणार कायापालट

श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाचा होणार कायापालट

Next

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेला सप्तश्रृंगी गडावरील विविध विकासकामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली आहे. त्यामुळे गडाचा कायापालट होणार असल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गडावरील जवळपास ३७४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या कक्षेत येत असून अवघे ९ हेक्टर क्षेत्र सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायती अंतर्गत येते. उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तश्रृंगी गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. सप्तशृंगगड २००१ पासून '''' क '''' वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र होते. सप्तश्रृंगी गडावर येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत उपलब्ध सुविधांची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. अंतर्गत रस्ते आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. भगवती मंदिर परिसरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अतिशय अल्प निधी मिळतो. त्यामुळे कामे करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्यामुळे सप्तश्रृंगी गड तीर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सप्तश्रृंगी गडास '''' ब '''' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सप्तश्रृंगी गडास सुमारे २५ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

इन्फो

विकास आराखडा मंजुरीच्या टप्प्यात

सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी ग्रामपंचायत व सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रयत्नशिल असून. सप्तश्रृंगी गडावरील पाणी टंचाई, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, जलवाहिनी, सुलभ स्वच्छता गृह, निवारा शेड, भक्तनिवास, बसस्थानक, गावातंर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण , मुख्य रस्त्यावर डोम, निवारा शेड, व्यावसायिक गाळे, भाविकांसाठी चिंतन हॉल व प्रतीक्षा गृह, सुसज्ज रुग्णालय आदी कामांचा विकास आराखडा तयार असून मंजुरीसाठी अतिम टप्प्यात आहे.

कोट.... श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गड विकास आराखडा तीन वर्षापासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. सातत्याने पाठपुरावा सुरु असून आता खऱ्या अर्थाने निधीची तरतूद होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने निधीची तरतूद केल्यामुळे कामांना चालना मिळणार आहे.

- राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य.

Web Title: Shrikshetra Saptashranggada will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.