पारंपरिक मार्गाने निघणार श्रीराम रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:12 AM2018-03-25T00:12:15+5:302018-03-25T00:12:43+5:30

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम व गरुड रथाची येत्या मंगळवारी (दि.२७) कामदा एकादशीला पारंपरिक मार्गाने रथयात्रा काढण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. रामनवमी तसेच रथोत्सव मोठ्या उत्साहात तसेच शांततेत साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

Shriram Rath Yatra will come out in a traditional way | पारंपरिक मार्गाने निघणार श्रीराम रथयात्रा

पारंपरिक मार्गाने निघणार श्रीराम रथयात्रा

googlenewsNext

पंचवटी : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम व गरुड रथाची येत्या मंगळवारी (दि.२७) कामदा एकादशीला पारंपरिक मार्गाने रथयात्रा काढण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. रामनवमी तसेच रथोत्सव मोठ्या उत्साहात तसेच शांततेत साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, प्रभाग समिती सभापती प्रियंका माने, सरकारवाडा पोलीस निरीक्षक अशोक भगत, गुन्हे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, वीज वितरण कंपनीचे पद्माकर हटकर आदी उपस्थित होते. रामनवमी तसेच श्रीराम व गरुड रथयात्रा असल्याने या दिवशी भाविकांनी विशेषत: रथोत्सव समितीच्या सदस्यांनी काय उपाययोजना करावी यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी झालेल्या बैठकीत राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रथातील मूर्तीचे दर्शन घ्यावे, परंतु रथावर चढू नये, रथोत्सव मार्गावर रथ ओढणाºयांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रथावर रथोत्सव समितीच्या वतीने नेमलेल्या सदस्यांनी थांबावे, ढोल पथकाची संस्था कमी करावी तसेच रथोत्सव दिवशी रामकुंडात देवाला अवभृत स्नान घातले जात असल्याने गोदावरी नदीला वाहते पाणी सोडावे, गाडगे महाराज पुलाखाली विद्युत व्यवस्था करावी आदी सूचना मांडण्यात आल्या. या बैठकीला रघुनंदन मुठे, राकेश शेळके, देवांग जानी, नितीन शेलार, सचिन डोंगरे, उमापती ओझा, छोटूसिंग भोईर, धनंजय पुजारी, रावसाहेब कोशिरे, अमित भोईर, नंदू पवार, पद्माकर पाटील, अविनाश दीक्षित, लक्ष्मण धोत्रे, प्रतीक गवळी, बाळू गवळी, श्याम पिंपरकर, सुनील फरताळे, किरण पानकर, महेश महंकाळे, मुकुंद गांगुर्डे, किशोर गरड आदींसह रास्ते आखाडा तालीम संघ, गरुड रथाचे पदाधिकारी, पाथरवट समाज पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. रथोत्सव कालावधीत शुभेच्छा फलकांवर गुन्हेगार तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचे फोटो लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल तसेच रथोत्सवाच्या दिवशी रथमार्गावर वाहने आणू नये व उभी करू नये, रथमार्गावर अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कारवाई केली जाईल, असे बर्डेकर यांनी सांगितले.

Web Title: Shriram Rath Yatra will come out in a traditional way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक