भेंडाळीत लोकसहभागातून श्रीराम मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:09 PM2019-04-06T16:09:19+5:302019-04-06T16:09:38+5:30
एक्कावन्न लाखाची वर्गणी : १२ एप्रिलला प्राणप्रतिष्ठा
सायखेडा : भेंडाळी आणि औरंगपूर या दोन्ही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी संयुक्त श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने ५१ लाख रु पयाची वर्गणी जमा करून भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. येत्या १२ एप्रिल रोजी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
सुमारे शंभर वर्ष जुने श्रीराम मंदिर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी होते. मंदिराची पडझड होत असल्याने त्याच ठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभारण्याचा दोन्ही गावांच्या नागरिकांनी निश्चय केला. दोन वर्षे वेगवेगळे प्लॅन तयार करण्यात आले. गावात मंदिर उभारण्याचा संकल्प झाला आणि गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार मंदिरासाठी योगदान दिले. वर्षभरापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरु वात झाली. शेतकरी ,व्यावसायिक, नोकरदार यांनी हातभार लावून ५१ लाख रु पयांचा निधी जमा केला. शिंगवे येथील ठेकेदाई धोंडीराम रायते यांनी कमी दराने काम पूर्ण केले. मंदिरात जयपूर येथून मूर्ती आणण्यात आल्या आहेत. दि. १० एप्रिल रोजी शोभायात्रा, नांदीश्राद्ध, मंगलस्नान, गणपती पूजन, नवग्रह पूजन, होमहवन. दि. ११ एिप्रल रोजी स्थापित देवता पूजन, होमहवन,मूर्तीस धान्यदिवस. दि. १२ एप्रिल रोजी मूर्ती स्थापना, कलशारोहन,महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शंकराचार्यांची उपस्थिती लाभणार
यानिमित्त काशी येथील शंकराचार्य विदा नृशिंहभारती रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांच्या हस्ते कलशपूजन, मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी गुडीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत सलग पंधरा दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय राज्यातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.