श्रीराम विद्यालयातील विद्यार्थिनी चमकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:07 AM2019-05-29T01:07:50+5:302019-05-29T01:08:31+5:30
नाशिक विभागातील निकालाप्रमाणेच महानगरपालिका क्षेत्रातील पंचवटी विभागातील महाविद्यालयांमध्येही मुलींनी बारावीच्या परीक्षेत उलेखनीय यश संपादन केले आहे.
पंचवटी : नाशिक विभागातील निकालाप्रमाणेच महानगरपालिका क्षेत्रातील पंचवटी विभागातील महाविद्यालयांमध्येही मुलींनी बारावीच्या परीक्षेत उलेखनीय यश संपादन केले आहे. पंचवटीतील तपोवन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेत सफल बूब या विद्यार्थ्याने ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर कशी खंडेलवाल या विद्यार्थ्याने ७४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. दिव्या मैंद या विद्यार्थिनीने ६९ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात तिसरा क्रमांक पटकावला.
वाणिज्य विभागात आशिष गांधी याने महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याला ८६ टक्के गुण मिळाले, तर द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण
झालेल्या संकेत मोहिते याला ८१ टक्के गुण मिळाले. जयेश गोदावरी हा ८० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. श्रीराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा यंदा बारावीच्या परीक्षेत कला विभागात ८९ टक्के निकाल लागला आहे.