शिरसगाव लौकी बाजारात उष्णतेमुळे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 06:15 PM2019-04-02T18:15:45+5:302019-04-02T18:16:08+5:30
मानोरी : यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच वैफल्यग्रस्त असताना मागील पाच ते सहा दिवसापासून उष्णतेचा पारा येवला तालुक्यात ३८ ते ४० अंश पर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्यास सुरु वात झाली आहे.
मानोरी : यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच वैफल्यग्रस्त असताना मागील पाच ते सहा दिवसापासून उष्णतेचा पारा येवला तालुक्यात ३८ ते ४० अंश पर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्यास सुरु वात झाली आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील शिरसगांव लौकी येथे भरणारा सकाळच्या सत्रात भरणारा नियमीत आठवडे बाजारात उष्णतेच्या दाहकतेमुळे परिसरातील नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. व्यापारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते.
शिरगाव लौकी येथील बाजारात अनेक छोटे मोठे व्यापारी आपली दुकाने थाटून बसलेले असतात. यात भाजीपाला विक्र ीसाठी देखील अनेक व्यापारी आलेले असतात यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरीवर्गाकडून भाजीपाल्याचे पीक न घेतल्याने महागड्या दराने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून वाढत्या तापमानामुळे व्यापाऱ्यांवर देखील काहीसे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. उष्णतेचा कहर झाला असून उन्हात मिनिटभर उभे राहणे देखिल कठीण झाले आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून या गावात उत्तम प्रकारे आठवडे बाजार भरतो. आणि व्यावसायिक ही चांगल्या प्रकारे आपला माल बाजारात विक्र ीस आणतात. परंतु दुष्काळ आणि वाढती उष्णता त्यात शेतकरी व मजुरांवर परिणाम होत असून ग्राहकांच्या गैर हजेरीत आठवडे बाजारात शुकशुकाट असल्याचे मिळत आहे.
वळदगाव, जऊळके, पिंपळगाव लेप, शिरसगांव लौकी, शेळकेवाडी, सोमठाणदेश आदी गावातील ग्राहकांना हा आठवडे बाजार तीन-चार किलोमीटर असुन दिवसेंदिवस उष्णता कमालीची वाढल्याने शिरसगाव लौकीच्या बाजारपेठेत काहीसे आर्थिक व्यवहार मंदावले आहे.
(फोटो ०२ मानोरी बाजार) : उष्णता वाढल्याने शिरसगाव लौकी बाजारात ओस पडलेली दुकाने.