सावानाचा आजपासून जिल्हा साहित्यिक मेळावा

By admin | Published: October 1, 2016 01:40 AM2016-10-01T01:40:21+5:302016-10-01T01:40:51+5:30

शारदीय उत्सव : आज उद्घाटन, कविसंमेलन

Shubana district literary gathering from today | सावानाचा आजपासून जिल्हा साहित्यिक मेळावा

सावानाचा आजपासून जिल्हा साहित्यिक मेळावा

Next

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या ४९ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि.१) सायंकाळी ६ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात संमेलनाध्यक्ष भीष्मराज बाम आणि प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर कविसंमेलन रंगणार आहे.
दि. १ आणि २ आॅक्टोबर रोजी आयोजित या साहित्यिक मेळाव्यात वाङ्मयीन चर्चेची मेजवानी साहित्य रसिकांना उपलब्ध होणार आहे. दि. १ रोजी होणाऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. शंकर बोऱ्हाडे भूषविणार असून, संदीप जगताप सूत्रसंचालन करणार आहेत. त्यानंतर रविवार दि. २ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्रीपाद जोशी यांचे ‘संमेलन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ११ वाजता संमेलनाध्यक्ष भीष्मराज बाम यांची मुलाखत मृणालिनी अत्रे व प्रणव रत्नपारखी घेणार आहेत.
दुपारी १२ वाजता ‘साहित्य आणि कलांचे भाषिक आकलन’ या विषयावर होणाऱ्या परिसंवाद लोकेश शेवडे, एकनाथ सातपूरकर, आनंद ढाकीफळे, लीना हुन्नरगीकर, किशोर पाठक सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता ‘माय बाप एक कृतज्ञता’ हा कार्यक्रम अरुण इंगळे, राजेंद्र उगले व रवींद्र मालुंजकर सादर करतील. सायंकाळी ४ वाजता दादासाहेब फाळके व गदिमा यांच्यावर लघुपट दाखविण्यात येणार आहे.

Web Title: Shubana district literary gathering from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.