शुभा खिंवसरा यांचा दीक्षा सोहळा
By admin | Published: December 19, 2014 11:15 PM2014-12-19T23:15:06+5:302014-12-19T23:44:47+5:30
शुभा खिंवसरा यांचा दीक्षा सोहळा
सिन्नर : येथे शुभा खिंवसरा या २८ वर्षीय पदवीधर तरुणीचा जैन संघ आणि खिंवसरा परिवाराच्या वतीने दीक्षा समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून साध्वी-साधू व भाविकांनी हजेरी लावली.
जैन भगवती दीक्षा महोत्सवानिमित्त येथील नर्मदा लॉन्स येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात केसर छाटना, कुंकूम, मेहंदी, रक्षाबंधन, बिरद थाळ, साधू-साध्वींची प्रवचने आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे संचलन सुशीला समदडिया, प.पू. मधुस्मिताजी महाराज यांनी केले. प. पू. कीर्तीसुधाजी, ज्ञानप्रभाजी, करुणाजी, विचक्षणाजी, संयमप्रभाजी या साध्वीनी याप्रसंगी उद्बोधन केले. डॉ. सुभाष खिंवसरा, स्थानकवासी जैन संघ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.