गुरुनानक जयंतीनिमित्ताने शोभायात्रा

By Admin | Published: November 22, 2015 11:44 PM2015-11-22T23:44:45+5:302015-11-22T23:46:46+5:30

गुरुद्वारांमध्ये कार्यक्रम : भजन, लंगरसह धार्मिक सोहळा रंगणार

Shubhayatra by Guru Nanak Jayanti | गुरुनानक जयंतीनिमित्ताने शोभायात्रा

गुरुनानक जयंतीनिमित्ताने शोभायात्रा

googlenewsNext

नाशिक : शीख धर्मियांचे पहिले गुरू गुरुनानक देवजी यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील ठिकठिकाणच्या गुरुद्वारांत विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून रविवारी दुपारी शिंगाडा तलाव येथील गुरुनानक दरबार येथून गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेची तसेच गुरुग्रंथ साहिबची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. लेजीमपथक, ढोलपथकासह शहर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.
शिंगाडा तलाव येथून निघालेली मिरवणूक शालिमार, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा मार्गे, शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौकातून वेताळबाबा मंदिर, काट्यामारुती चौकातून हिरावाडी रोडवरील श्रीरामनगर, गुरू रामदास गुरुद्वारापर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेच्या अग्रभागी पंज प्यारे, तसेच फुलांनी सजविलेल्या चारचाकी वाहनात गुरुनानक देवजी यांची प्रतिमा तसेच गुरुग्रंथ ठेवण्यात आला होता.

Web Title: Shubhayatra by Guru Nanak Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.