चैत्र पौर्णिमेला गडावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:54+5:302021-04-29T04:11:54+5:30

रेमडेसिविरचा पुरवठा अद्याप कमीच नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात अद्याप तुटवडा जाणवत असून अनेक रुग्णांचे नातेवाईक यासाठी वणवण करताना ...

Shukrashukat on the fort on Chaitra Pournima | चैत्र पौर्णिमेला गडावर शुकशुकाट

चैत्र पौर्णिमेला गडावर शुकशुकाट

Next

रेमडेसिविरचा पुरवठा अद्याप कमीच

नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात अद्याप तुटवडा जाणवत असून अनेक रुग्णांचे नातेवाईक यासाठी वणवण करताना दिसून येत आहे. या इंजेक्शनचे वितरण पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असले, तरी जिल्ह्याला अद्याप पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने सर्वच रुग्णालयांना पुरवठा करणे अद्याप शक्य होत नाही.

गंगेवरील गोरगरिबांची गैरसोय

नाशिक : धार्मिक विधीसाठी गंगेवर येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने या परिसरातील गोरगरिबांची उपासमार होऊ लागली आहे. काही संस्था आणि दानशूर नागरिकांच्या वतीने येथे अन्नवाटप केले जात असले, तरी त्यांची संख्या कमी असल्याने काही वेळा अन्नाचे पाकीट मिळविण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे दिसते.

शहरातील अनेक भागांत शुकशुकाट

नाशिक : कोरोना रुग्णवाढीचा नागरिकांनी मोठा धसका घेतला असून शहरातील अनेक भागांत दिवसभर शुकशुकाट दिसून येत आहे. अनेक नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळतात. रात्रीच्या वेळी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही खूपच कमी झाली आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी

नाशिक : वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागांत दिवसभरातून दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शहरातील विविध भागांत डासांचा प्रादुर्भाव

नाशिक : शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे नागरिकांना रात्रीची झोप घेणे कठीण झाले आहे. कोरोनामुळे महापालिकेचे धूरफवारणीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. परिसरात धूरफवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अवैध मद्यविक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

नाशिक : लॉकडाऊनमुळे शहरातील काही भागांत अवैध मद्यविक्रीला ऊत आला असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीमुळे अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा वावर असतो. याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी अवैध मद्यविक्रीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

नातेवाइकांकडून ऑक्सिजन सिलिंडरचा शोध

नाशिक : शहरात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडरचा शोध घेत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. अनेक छोट्या रुग्णालयांना ऑक्सिजनअभावी रुग्णांवर उपचार करणे शक्य हाेत नाही. राज्य शासनाने ऑक्सिजनचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Shukrashukat on the fort on Chaitra Pournima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.