मालेगावात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:30+5:302021-03-15T04:14:30+5:30
दवाखाने, औषधे विक्रीची दुकाने, खाद्य पदार्थांची दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने आदी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. त्यातच रविवारची शासकीय ...
दवाखाने, औषधे विक्रीची दुकाने, खाद्य पदार्थांची दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने आदी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. त्यातच रविवारची शासकीय सुटी असल्याने बॅंका, पोस्ट, इतर शासकीय कार्यालये पूर्णपणे बंदच होती. दोन दिवसीय बंदमुळे हात मजूर, रिक्क्षा चालक, किरकोळ वस्तू विक्रेते, हातगाडी चालक यांना मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागला. रोजचा चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. रोजचे जीवनमान सुरळीत सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जात आहे. मालेगाव ही कसमादेसह चाळीसगाव, धुळे, पिंपळदर, साक्री या परिसरातील लोकांची हक्काची बाजारपेठ आहे. त्यादृष्टीने शहरातील व्यापाऱ्यांनीही आगामी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता मालाची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून ठेवली आहे. कापड, साड्या, सुवर्णालंकार, चप्पल, बूट व इतर साहित्य घेण्यासाठी परिसरातून ग्राहक येत असतात. बंदमुळे या सर्वांवर मर्यादा आल्या आहेत.