नायगाव परिरसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 11:59 PM2021-04-10T23:59:34+5:302021-04-11T00:07:43+5:30
नायगाव : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.नायगाव खोऱ्यातील गावांमध्येही शिरकाव वाढता असून, संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी शंभर टक्के बंद यशस्वी झाला.

नायगाव खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शनिवार व रविवार हे दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. शनिवारी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे. रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. मात्र अजूनही नागरिक सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
लसीकरणास प्रारंभ
प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड १९ चे लसीकरण सुरू झाले आहे. आजपर्यंत सुमारे ८०० नागरिकांनी लस देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे, अभिजित देशमुख यांनी दिली. गावातील संसर्ग आटोक्यात येण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपाययोजना करीत आहे. मात्र ग्रामस्थ नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे.