सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 08:55 PM2020-04-22T20:55:40+5:302020-04-23T00:21:06+5:30
पांगरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
पांगरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही वाहने रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे सिन्नर-शिर्डी हा अत्यंत रहदारीचा महामार्ग सध्या निर्मनुष्य झाला आहे.
मुंबई, गुजरात, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीसाठी येत असतात. त्यामुळे येथे नेहमी दिवसा असो की रात्र वाहनांची वर्दळ सुरूच असते. परंतु लॉकडाउन झाल्यापासून महामार्ग पूर्णपणे वाहनविरहित आहे. अपवाद परिस्थितीत शेतकरी व नागरिक, बँक प्रतिनिधी, कर्मचारी हेच रस्त्याने जाताना दिसतात. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीमधील नियमित कामे करत आहेत. सध्या गावामध्ये मेडिकल, बॅॅँक, भाजीपाला, किराणा दुकाने सुरू असून, नागरिक काही वेळेत खरेदी करून आपापल्या घरामध्ये राहण्यास पसंती देत आहेत.