इगतपुरी तालुक्यात मंदिरांमध्ये शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:28 PM2021-03-11T22:28:56+5:302021-03-12T00:37:55+5:30
नांदूरवैद्य : महाशिवरात्रीनिमित्त इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, पिंपळगाव घाडगा, साकूर आदी परिसरात असलेल्या शिव मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी न करता घरीच विधिवत पूजन केले.
नांदूरवैद्य : महाशिवरात्रीनिमित्त इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, पिंपळगाव घाडगा, साकूर आदी परिसरात असलेल्या शिव मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी न करता घरीच विधिवत पूजन केले.
गोंदे दुमाला फाटा येथील महादेव मंदिरातमहाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होत असते. परंतु यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार या मंदिरात मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते कोरोनाच्या नियमांचे पालन करीत अभिषेक व दैनंदिन पूजन करण्यात आले. भाविकांनी मंदिरात गर्दी न करता घरीच शिवशंभूचे विधिवत पूजन करत ग्रंथांचे वाचन केले. त्याचप्रमाणे नांदूरवैद्य येथील महादेव मंदिरातदेखील मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मंदिराला विद्युत रोषणाई न करता अत्यंत साधेपणाने कार्यक्रमांचे आयोजन इगतपुरी तालुक्यातील महादेव मंदिरांत करण्यात आले आहे.