त्र्यंबकेश्वरला शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:57+5:302021-03-17T04:15:57+5:30
ट्रेकिंग वाढले नाशिक : शहर परिसरातील डोंगरांवर ट्रेकिंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात ट्रेकिंग करणारे असंख्य ग्रुप पहाटे डोंगरांवर ...
ट्रेकिंग वाढले
नाशिक : शहर परिसरातील डोंगरांवर ट्रेकिंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात ट्रेकिंग करणारे असंख्य ग्रुप पहाटे डोंगरांवर चढाई करतांना दिसून येतात.
बाजार झाले बंद
नाशिक : गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद करण्यात आले आहे. गेल्या ८ तारखेपासून सर्व आठवडे बाजार ओस पडले आहेत.
अवजड वाहतूक
नाशिक : हॉटेल मिरची ते टाकळी गाव मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे.
अनधिकृत जोडणी
नाशिक: घरगुती विजेचा वापर व्यावसायिक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांनी भाडेकरूंना, तसेच दुकानांना आपल्या घरातून वीजपुरवठा करीत आहेत.
अभ्यासिकेला प्राधान्य
नाशिक: सध्या शाळा, महाविद्यालयांना निर्बंध आल्याने अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी अभ्यासिकेला प्राधान्य देत असल्याने अभ्यासिका फुल्ल झाल्या आहेत.
लाल मिरची दाखल
नाशिक: घरगुती मसाले करण्यासाठी लागणाऱ्या विविध जातीच्या लाल मिरची शहरात दाखल झाल्या आहेत. ठिकठिकाणी लाल मिरची विकली जात आहे.