त्र्यंबकेश्वर शहरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 11:49 PM2021-04-10T23:49:10+5:302021-04-11T00:09:04+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात सर्व आस्थापनांसह बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने शुकशुकाट दिसून आला. यावेळी नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार करत घराबाहेर न पडणे पसंत केले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सुस्तावलेल्या यंत्रणेला गती मिळाली.

त्र्यंबकेश्वर शहरात नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. त्र्यंबकराजासह शहरातील सर्व मंदिरे बंद आहेत. शिवाय हॉटेल्स, भाजीमार्केटही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, सुस्तावलेल्या यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर गती मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व मेडिकल स्टाफ आदींची बैठक घेऊन धारेवर धरले. या बैठकीत कंटेन्मेंट झोनच्या कामांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला कंटेन्मेंट झोनबाबत गोंधळ निर्माण झाला होता. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. ग्रामीण भागापेक्षा नगरपालिका हद्दीत जास्त रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी व्यक्त केली होती. त्यानुसार ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ५६, संदीप फाउंडेशनमध्ये ३, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५, तर खासगी रुग्णालयात ४ आणि गृहविलगीकरण कक्षात २७४ रुग्ण
आहेत.