वणी परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 06:13 PM2020-05-12T18:13:06+5:302020-05-12T18:13:20+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आल्याने वणी शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने प्रवेशबंदी करु न जागृतता दाखवली.
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आल्याने वणी शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने प्रवेशबंदी करु न जागृतता दाखवली. तालुक्यात र्इंदोरे ,निळवंडी, मोहाडी या ठिकाणी कोरोनाचे बाधित रु ग्ण आढळले याची गंभीर दखल घेत वणी शहर तीन दिवस पुर्णत: बंद ठेवण्याबाबत नागरिक व व्यापारी यांनी निर्णय घेतला. त्यास
अनुसरु न मंगळवारी याचे पालन करण्यात आले. याबाबत ग्रामपालिकेने सोमवारी रिक्षा फिरवुन सुचित करत माहिती दिली होती. दरम्यान, कळवण चौफुली पिंपळगाव नाका व संखेश्वर मंदीर परीसर या तीन ठिकाणाहून शहरात प्रवेश करता येतो. या तीनही ठिकाणी बाहेरु न आलेल्या व्यक्ती व वाहनांची माहीती व चौकशी गरजेची आहे. त्यात बाहेरील व्यक्ती विनाकारण दुचाकी व चारचाकीने प्रवेश करत टाईमपास करण्यासाठी येतात अशीही चर्चा आहे तर नाशिक येथुन अपडाऊन करणाऱ्यानीही प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे. वारंवार सुचीत करु नही गांभीर्य नसलेल्या घटकांमुळे अतिरीक्त ताण यंत्रणांवर पडत आहे.