वणीच्या व्यापारी बाजारपेठेत शुकशुकाट

By admin | Published: November 12, 2016 10:52 PM2016-11-12T22:52:28+5:302016-11-12T22:56:43+5:30

वणीच्या व्यापारी बाजारपेठेत शुकशुकाट

Shukushkat in the merchant market of Wani | वणीच्या व्यापारी बाजारपेठेत शुकशुकाट

वणीच्या व्यापारी बाजारपेठेत शुकशुकाट

Next

 वणी : ठप्प अर्थव्यवस्था, बाजारपेठेतील शुकशुकाट, प्रचंड आर्थिक तंगी अशा परिस्थितीमुळे येथील बाजारपेठेत स्मशानशांतता दिसून येत आहे. पाचशे व एक हजारच्या नोटा रद्द केल्याच्या धक्क्यातून अद्यापही काही घटक सावरले नसून मोदीच्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकपुढे भलेभले नतमस्तक झाले आहेत. बंद करण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या नोटांवरून राजकीय पक्षात रणकंदन माजले असले तरी ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे.
दिवाळी मंदीच्या काळात गेल्यानंतर लग्नसराईत सुगीचे दिवस येतील या आशेने विविध व्यावसायिकांनी नियोजन आखत कर्जे, उसनवारी, भिशी अशा मार्गातून भांडवल उभे करून गुंतवणूक केली होती. मात्र चलन रद्दबातलनंतर सर्वत्र शुकशुकाट आहे. माल आहे पण ग्राहक नाही; ग्राहक आहे मात्र त्यांच्याकडे छोट्या नोटा नाहीत. त्यामुळे दुकानातील माल शोभेचे बाहुले बनला आहे. मूलभूत गरजा त्यात किराणा माल, दूध, भाजीपाला, दळणवळण या अत्यावश्यक गरजा पूर्ण करता करता सर्वसामान्य घटकाबरोबर मध्यमवर्गीय पूर्ण मेटाकुटीस आला आहे. उधारीशिवाय त्याच्या पुढे पर्याय शिल्लक राहिलेला नाही. कंपन्यांमध्ये व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे पैसे काही कंपन्यांनी देणे लांबणीवर टाकले आहे. बांधकाम क्षेत्रातील कारागिरांचे पैसे वेळेवर अदा करणे अवघड असल्याने अल्पविरामाची परिस्थिती आहे. आज पोस्टातून एक लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी दोन हजाराच्या पटीत नोटा बदलून देण्यात आल्या. (वार्ताहर )

Web Title: Shukushkat in the merchant market of Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.