नांदूरशिंगोटे गावात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:15 PM2020-04-17T20:15:45+5:302020-04-18T00:30:23+5:30
नांदूरशिंगोटे : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या महिन्यापासून उपाययोजना राबविल्या आहेत.
नांदूरशिंगोटे : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या महिन्यापासून उपाययोजना राबविल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण गाव लॉकडाउन असून, ग्रामस्थ त्याचे कडेकोट पालन करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील मोठे गाव असून सर्वात मोठी बाजारपेठ येथे आहे. गेल्या महिनाभरापासून अत्यावश्यक सेवा वगळता येथील सर्व व्यवहार बंद आहेत. १४ एप्रिलनंतर लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव टांगणीला आहे. गाव दोन्ही जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नाशिक-पुणे व नाशिक-अहमदनगर महामार्गावर येथील सरहद्दीवर वावी पोलिसांनी नाकाबंदी करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे गाव परिसरातील महत्त्वाचे गाव असल्याने येथे प्रथमपासूनच खबरदारी घेतली गेली. संपूर्ण गाव बंद केले असून, गेल्या महिनाभरात भाजीपाला वगळता एकही आठवडा बाजार भरविण्यात आला नाही. मंगळवार दि. १४ मार्चपासून संपूर्ण गाव लॉकडाउन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.