पंचवटी विभागीय कार्यालयात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:41 PM2020-04-09T17:41:44+5:302020-04-09T17:42:22+5:30
देशभरात कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालल्याने पंधरा दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. एरवी लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणारे पंचवटी विभागीय कार्यालय सध्या ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंचवटी : देशभरात कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालल्याने पंधरा दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. एरवी लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणारे पंचवटी विभागीय कार्यालय सध्या ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यालयात मनपा कर्मचारी वगळता कोणतेही लोकप्रतिनिधी आणि नागरिक फिरकत नाहीत. त्यातच विविध प्रकारच्या तक्र ारी घेऊन येत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणारे झेरॉक्स नगरसेवकदेखील फिरत नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. विभागीय कार्यालयात नागरिक विविध तक्र ार तसेच महसूल भरण्यासाठी तर कोणी विविध परवानगी, जन्ममृत्यू दाखले यासह अन्य कामासाठी येतात, मात्र काही दिवसांपासून
लॉकडाउन करण्यात येऊन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आल्याने विभागीय कार्यालय ओस पडले आहे. कार्यालयात विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग त्यांचे दैनंदिन काम करताना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठा यासह अनेक तक्र ारी कमी झाल्या आहेत. विनाकारण
पालिकेच्या कार्यालयात येऊन चमकोगिरी करणाºया काही स्वयंघोषित तसेच झेरॉक्स नगरसेवकांनादेखील कोरोनामुळे लगाम बसला असल्याचे मनपा कर्मचाºयांनी बोलून दाखविले. सध्या विभागीय कार्यालयात केवळ गोरगरीब जनतेला रोज मोफत भोजन पुरविणे तसेच अपंग व ज्या नागरिकांना शिधा नाही, असे नागरिक कार्यालयात येऊन आपली नावे-नोंदणी करत आहे.