सप्तशृंग गडावर पावसामुळ शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 03:02 PM2019-08-05T15:02:08+5:302019-08-05T15:02:50+5:30
वणी : सप्तशृंग गडावरील पर्वतरांगामधे तुफान पाऊस सुरु असुन गडावरील व्यवसाय पुर्णत: ठप्प झाले तर भाविकांअभावी संपुर्ण गडावर शुकशुकाट जाणवतो आहे.
वणी : सप्तशृंग गडावरील पर्वतरांगामधे तुफान पाऊस सुरु असुन गडावरील व्यवसाय पुर्णत: ठप्प झाले तर भाविकांअभावी संपुर्ण गडावर शुकशुकाट जाणवतो आहे.
सप्तशृंग गडावर गेल्या तीन ते चार दिवसांपासुन पर्जन्यवृष्टी सुरु असुन उंच उंच डोंगरावरु न पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या स्वरु पात वाहत आहेत हिरवीगार वनसृष्टी दाट धुके थंड थंड वाहणारे वारे व डोळ्यात निसर्ग साठवुन ठेवावा असे वातावरण हे वर्णन एखाद्या हीलस्टेशनसारखे असुन गडावर पावसामुळे असेच वातावरण आहे मात्र आसे वातावरण हवेहवेसे आनंददायी व नयनमनोहारी वाटत असले तरि आतिवृष्टीमुळे गडावरील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत तर भाविकाआभावी गडावर शुकशुकाट झाला आहे एरव्ही सामान्यपणे सर्वसाधारणत: सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविक गडावर येतात तर सध्या अतिवृष्टीमुळे भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.नांदुरी ते सप्तशृंग गड हे दहा कीलोमीटरचे अंतर असुन दाट धुके व प्रचंड पावसामुळे खाजगी वाहनाने येणारे भाविकसंख्येत घट झाली आहे. तर परिवहन विभागाच्या एस टि बसेसमधेही भाविक प्रवासी संख्या बोटावर मोजण्याइतकि आहे दरम्यान गडावरील रोपवेलगत चंड्याबाबाची विहिर असुन गडावरील प्रवाहीत पावसाचे पाणी मार्कंड पिंप्री भागातुन गिरणा धरणाला जाऊन मिळते तसेच देवीच्या कोकणगड भागातुन दरेगाव बारीपासुन पाण्याचा प्रवाह पुणेगाव पर्यंत जातो तसेच गडावरील दुसर्या भागातुन भातोडे परिसरात पावसाचे पाणी जाते तसेच नांदुरी गोबापुर कळवण अशा मार्गाने गिरणाधरणा मध्ये पावसाचे पाणी प्रवाहीत होत असल्याची माहीती उपसरपंच राजेश गवळी यांनी दिली: दरम्यान सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. येथील भातशेती पाण्याखाली आली आहे. तर बेहडी नदीला मोठा पुर आला आह.े .शेतजमिनीत गाळसद्र्ष्य चिखल व पाणी साचले आहे भातशेतीला हा पाऊस उपयुक्त मानन्यात येत असला तरी आतिवृष्टीच्या तडाख्याने नुकसान होऊ शकते अशी माहीती दरेगाव येथील सोमनाथ गवळी यांनी दिली. पावसामुळे गडावरील फुले व नारळांची दुकाने पुजेच्या साहीत्यांची दुकाने हॉटेल लॉजिंग हे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था मंदावल्याची माहीती गिरीश गवळी व संदीप बेनके यांनी दीली.