दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:40 PM2017-08-01T23:40:35+5:302017-08-02T00:09:07+5:30

राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले आहे.

Shutdown centers in the district in two months | दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे बंद

दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे बंद

Next

नाशिक : राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले आहे.
महसूल दिनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या ३७९ सेवा आॅनलाइन करण्यात आल्या असून, त्यात महसूल विभागाशी निगडित ५१ सेवा आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून नजीकच्या काळात सर्व प्रकारचे शासकीय दाखले आॅनलाइन देण्यात येणार आहेत. कोणत्याही व्यक्तीने सेतू केंद्रात जाऊ नये, अशी त्यामागची कल्पना असून, ‘महा ई-सेवा केंद्र’ व सेतू यांच्या सर्व सेवा महाआॅनलाइनच्या पोर्टलवरून आॅनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीने देण्यात येणार आहेत. या प्रणालीमुळे नागरिकांचा सेतू केंद्राच्या चकरा मारण्याचा त्रास वाचेल शिवाय बनावट व चुकीच्या दाखल्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात एक लाख ३० हजार इतक्या नागरिकांना आॅनलाइनच्या माध्यमातून सेवा देण्यात आली असून, राज्यात नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तांत्रिक दोष दूर झाल्याने पेठ, सुरगाणा या अतिदुर्गम तालुक्यातही महा आॅनलाइनच्या माध्यमातून सेवा देण्यात आता कोणत्याही अडचणी नसल्यामुळे नजीकच्या काळात सेतू केंदे्र बंद करून नागरिकांनी घरी बसल्या शासनाच्या आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे सांगून गेल्या महिन्यात जिल्ह्यात बनावट शासकीय दाखले देण्याच्या प्रकारांच्या तक्रारींची दखल घेत दोन केंद्रे रद्द करण्यात आली असून, जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात दोन गुन्हे नाशिकमध्ये व एक कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Shutdown centers in the district in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.