नाशिकचा सिद्धार्थ परदेशी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:45 AM2018-07-06T00:45:25+5:302018-07-06T00:45:45+5:30
नाशिक : आशियाई क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंग या प्रकारासाठी निवडलेल्या भारतीय संघात नाशिकच्या सिद्धार्थ परदेशी याची निवड झाली आहे. यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नाशिक : आशियाई क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंग या प्रकारासाठी निवडलेल्या भारतीय संघात नाशिकच्या सिद्धार्थ परदेशी याची निवड झाली आहे. यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे.
१८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान जकार्ता, इंडोनेशिया येथे १८ व्या आशियाई क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणाऱ्या जलतरण, डायव्हींग आणि वॉटरपोलो या संघांची निवड करण्यासाठी दिल्ली येथे अंतिम निवड झाली. या निवड चाचणीत नाशिकचा सिद्धार्थ बजरंग परदेशी हा खेळाडू डायव्हींग या प्रकारात सहभागी झाला होता. अंतिम चाचणीत त्याने सर्वाधिक गुण मिळवित भारताच्या संघात स्थान मिळविले आहे.
याआधी सिद्धार्थने तीन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच सिद्धार्थने परदेशाचे प्रशिक्षक कसूबा ओंन्डीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामिगरी करून दक्षिण आशियायी स्पर्धा, राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये भारताला पदकांची कमाई करून दिली आहे. यामध्ये श्रीलंका येथील दक्षिण आशियायी स्पर्धामध्ये सुवर्णपदक, तर सन २०१६ ला जपान येथे झालेल्या सातव्या आशियायी स्पर्धामध्ये पाचवे स्थान आणि उझबेकीस्थान येथील नवव्या आशियायी स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच इंडोनेशिया येथे झालेल्या स्पर्धेतही सिद्धार्थने एक सुवर्णपदक आणि एक कांस्य पदक प्राप्त केले आहे. सिद्धार्थचे वडील कबडडीचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत.सिद्धार्थ सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स अकादमीमध्ये सराव करीत आहे. त्याने बारा वर्षांपूर्वी नाशिकरोड येथे सुरूवात केली. त्याचे कौशल्य बघून प्रशिक्षक मोगली आणि फारूक शेख यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्यानंतर सिद्धार्थने राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगला खेळ करून सुवर्णपदके मिळविली. त्यामुळे त्याला पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स अकादमीमध्ये दाखल होता आले .