सिद्धिविनायक गणेश मंदिरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 04:43 PM2018-12-25T16:43:00+5:302018-12-25T16:43:05+5:30
लोहोणेर : येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी गणेश भक्तांनी भल्या पहाटेपासूनच गर्दी केली होती. भाविकांसाठी मंदिर पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावर्षाची ही अखेरची अंगारकी असल्याने हजारो भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
लोहोणेर : येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी गणेश भक्तांनी भल्या पहाटेपासूनच गर्दी केली होती. भाविकांसाठी मंदिर पहाटे चार वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावर्षाची ही अखेरची अंगारकी असल्याने हजारो भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. गाभारा आकर्षक वेगवेगळ्या फुलांची सजविण्यात आला होता. मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.यावेळी मंदिर परिसरात सटाणा पोलीस ठाण्याच्या वतीने व राष्ट्रीय स्वयंसेवक जवानांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरातील काही भाविक पायी येऊन दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर खुले ठेवण्यात आले होते. आबालवृद्धांसह हजारो महिला भाविकांनी अंगारकी चतुर्थीच्या पर्वणी साधत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये मंदिरात रामकथेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंदिर ट्रस्टच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
(25ठेंगोडा गणपती)