सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला जिवंत देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:29 AM2018-09-20T00:29:24+5:302018-09-20T00:29:53+5:30
शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे.
सिडको : शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे. अंबड-लिंकरोडवरील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळ गेल्या सहा-सात वर्षांपासून सर्जिकल स्ट्राइक, वृद्धाश्रम, शेतकरी आत्महत्या, अमर जवान, अंधश्रद्धा यांसह विविध प्रकारच्या सत्य घटनांवर आधारित सजीव देखावे सादर केले आहेत. यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने पोलिसांवरील राजकीय हस्तक्षेपामुळे येणाऱ्या दबावाचा जिवंत देखावा सादर केला आहे. मद्यसेवन करून सिग्नल तोडणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया व्यक्तींना पोलिसांकडून पकडले जाते. यावेळी सदर व्यक्ती राजकीय पुढाºयांचे कार्यकर्ते अथवा संबंधित असल्यावर ट्रॅफिक पोलिसांना कशाप्रकारे त्रास होतो याबाबतचा सजीव देखावा सादर करण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पूजा पेंढारकर, पोलीस उपनिरीक्ष ललित खैरनार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गोसावी, प्रज्ञा पेंढारकर, मोरे आदींनी भूमिका निभावल्या आहेत.
एखाद्या व्यक्तीस पोलिसांनी न सोडल्यास राजकीय पुढारी हे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना फोन करतात. यानंतर संबंधित अधिकाºयास वरिष्ठांकडून त्या कार्यकर्त्याला सोडून द्यावे लागते. चांगल्या कामात व्यत्यय आणण्याचे काम राजकीय पुढारी कसे करतात व त्यास वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनादेखील कसे बळी पडावे लागते, याबाबतचा सजीव देखावा सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाच्या वतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर खैरनार, उपाध्यक्ष महेश चौधरी, श्रीकांत भाटे, सुनील भोर, अभय भालके, मिलिंद वाडेकर आदी प्रयत्नशील आहेत.
पोलिसांच्या अडचणींवर प्रकाशझोत
कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावीत असतात. काही वेळा राजकीय दबावामुळे त्यांना कामात अडचणी येतात. या अडचणींवर प्रकाशझोत टाकण्याचे काम सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.