लासलगाव-वेळापूर रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:17+5:302021-05-24T04:14:17+5:30
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी लासलगाव येथे येत असतात. मात्र रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले ...
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी लासलगाव येथे येत असतात. मात्र रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून मार्केटमुळे या रोडवर रहदारी असल्याने रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे, अशी मागणी रमेश पालवे व विशाल पालवे यांनी केली आहे. लासलगाव-वेळापूर या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून साईड पट्ट्यादेखील भरल्या गेल्या नाहीत. नागरिकांच्या वाहनाचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने या रस्त्याची वाट लागलेली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सदर मार्गावरून सदा सर्वदा वर्दळ सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होणे हे प्रकार आता नित्याचेच झाले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम करावे.
- विशाल पालवे, नागरिक
फोटो- २३ लासलगाव रोड
===Photopath===
230521\23nsk_25_23052021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ लासलगाव रोड