खमताणेला काटेरी बाभळींचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:23 PM2018-10-01T15:23:05+5:302018-10-01T15:25:44+5:30
औदाणे : खमताणे येथील गावाला काटेरी बाभळांनी वेढा घातला असुन व ग्रामपंचायतीने गांवतंर्गत रस्ता कामासाठी टाकण्यात आलेली खडी पाच महिन्यापासून पडून आहे.
औदाणे : खमताणे येथील गावाला काटेरी बाभळांनी वेढा घातला असुन व ग्रामपंचायतीने गांवतंर्गत रस्ता कामासाठी टाकण्यात आलेली खडी पाच महिन्यापासून पडून आहे. काटेरी बाभळांमुळे भुरटया चो-यांचे प्रमाण वाढुन डांसांचा उपद्रव वाढला असुन हे काटेरी बाभळे तोडन्यात यावे व रस्त्याचे काम करन्यात यावे हे दोन्ही कामे ग्रामपंचायतीने करावे अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. येथील गांवातील अनेक शेतकरी शेतात वास्तव्यास गेल्याने गांवातील घरे ओस पडली आहे. काटेरी बाभळांनी गांवाला वेढा घातल्याने रात्रीच्या वेळेस सुनसुनाट दिसत असल्याने भुरट्या चोरांना लपल्यासारख्यी ही काटेरी बाभळे वाढल्याने चोरांचे प्रमाण वाढणार आहे व झाडामुंळे डासांचा उपद्रव वाढला आहे ही झाडे तोडन्यात यावी तरच गावाचा श्वास मोकळा होईल. तसेच पाच महिन्यापासुन गांवतंर्गत रस्ता कामासाठी रस्त्यावर खडी पडुन असुन वाहनचालकांना व पायी जानार्या ग्रामस्थाना कसरत करावी लागत आहे. खडी उचलावी अन्यथा रस्ता दुरु स्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.