बंधाऱ्याला पाणवेलींचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:15 AM2020-03-16T00:15:17+5:302020-03-16T00:17:08+5:30
एकलहरे येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे.
एकलहरे : येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे.
एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात मोठा बंधारा बांधण्यात आला असून, त्याच्या आजूबाजूला एकलहरेगाव, शिलापूर, ओढा, एकलहरे वसाहत, गंगावाडी गावाचा परिसर आहे. मनपा हद्दीतून नदीपात्रात दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने ते फेसाळलेले पाणी एकलहरे बंधाºयापर्यंत
येते.
त्याबरोबरच नदीपात्रातील पाणवेली वाहून या बंधाºयापर्यंत आल्याने बंधाºयाच्या पाण्यावर सर्वत्र हिरवेगार शेवाळे पसरले आहे. त्यामुळे मोठा प्रमाणात दुर्गंधी वाढली असून, डासांचा उपद्रवदेखील वाढला
आहे. मनपाने हद्दीलगतच्या ग्रामीण भागाचा विचार करून नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रदूषणाची समस्या
नदीपात्रातून वाहून आलेल्या पाणवेली आणि फेसाळयुक्त पाणी एकलहरे बंधाºयात अडकल्याने साठलेल्या पाण्यावरील पाणवेलीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पंचवटीपासून नांदूर-मानूरपर्यंत महापालिका क्षेत्रात असलेल्या मलनिस्सारण केंद्रातून अपुºया प्रक्रि येमुळे फेसाळयुक्त पाणी बाहेर पडते. हेच पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. नदीपात्रातील पाणवेली व फेसाळयुक्त पाण्याबाबत येथील नागरिकांनी आंदोलनही केले आहे. मात्र दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.