नांदूरवैद्य-अस्वली रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:37+5:302021-05-28T04:11:37+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने मोठमोठे ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असल्याने खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले असून, नादुरुस्त होत आहेत. संबंधित विभागाने काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले होतेे; परंतु गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या वादामुळे या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसून या रस्त्याच्या कामासंबंधी आता संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्याचा पंधरा वर्षांपासून चाललेल्या वादावर तोडगा काढावा व तातडीने कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहेत. वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा केली असून, प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनदेखील संबंधित अधिकारी निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
------------------------
नागरिकांमध्ये संताप
रस्त्याने नेहमीच गोंदे दुमाला येथे औद्योगिक वसाहतीत दैनंदिन रोजगारासाठी असंख्य कामगार रात्री-अपरात्री ये-जा करत असतात तसेच शालेय बस, इगतपुरी आगाराच्या बस, महाविद्यालयीन विद्यार्थी, अनेक छोटे-मोठे वाहने याच रस्त्याने जात असून, घोटीला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून, परिसरातील वाहनधारकांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या रस्त्याची चाळण झाली असून, कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
---------------
नांदूरवैद्य-अस्वली रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे कामाच्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेला रस्ता. (२७ नांदूरवैद्य १)
===Photopath===
270521\27nsk_8_27052021_13.jpg
===Caption===
२७ नांदूरवैद्य १