चाळीत युरिया टाकल्यामुळे १२० क्विंटल कांदा सडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:44 PM2019-09-23T22:44:20+5:302019-09-23T22:45:39+5:30
देवळा : कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असतांनाच तालुक्यातील भऊर येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे या शेतकºयाचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला असून डोळ्यात तेल घालून चाळीतील कांद्याचे संरक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गत दोन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे आर्थिक नुकसान सोसत असतांना आठवडाभरापूर्वी कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरु वात झाली. यामुळे चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा शेतकºयांनी विक्र ीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली. बाजार भावात दररोज वाढ होत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
याच दरम्यान तालुक्यातील भऊर येथील विष्णू बापू आहेर या शेतकºयाने आपल्या राहत्या घरासमोर कांदा चाळीत उन्हाळी कांदा साठवणुक केलेला होता. चाळीतील हा कांदा सडू लागल्याचे आहेर यांच्या लक्षात आले. पावसाळी वातावरणामुळे सर्वत्र कांदा खराब होत असल्यामुळे चाळीतील कांदा खराब होऊ लागला असावा असा अंदाज त्यांनी काढला.
त्यांनी रविवारी (दि.२२) हा खराब कांदा चाळीबाहेर काढण्यास सुरूवात केली असता कोणी अज्ञात समाजकंटकाने आपल्या चाळीत कांद्यावर युरिया टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चाळीत साठवलेला चार ट्रॅक्टर ट्रॉली कांदा (अंदाजे १२० क्विंटल) खराब झाल्याने आहेर यांचे आजच्या बाजारभावाने जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुष्काळामुळे पाणी टंचाई असतांना पाण्याचे काटेकोर नियोजन करून मेहनतीने कांदा पिकाचे उत्पादन घेतले होते. कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळायला लागताच अज्ञात व्यक्तीने माझ्या कांदा चाळीत रासायनिक खत युरिया टाकल्याने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या बाबत देवळा पोलिस स्टेशनला तक्र ार देणार आहे.
ङ्क्त - विष्णू आहेर, शेतकरी.