नासाका परिसरात बिबट्याचे दर्शन

By admin | Published: October 27, 2016 11:50 PM2016-10-27T23:50:19+5:302016-10-28T00:16:40+5:30

नासाका परिसरात बिबट्याचे दर्शन

The sight of the leopard in the area of ​​NASA | नासाका परिसरात बिबट्याचे दर्शन

नासाका परिसरात बिबट्याचे दर्शन

Next

सिन्नर : नासाका केनगेटलगत पोपट सदाशिव गायधनी यांच्या मळ्यातून मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याला कारखान्याच्या परिसरात ग्रामस्थांनी बघितले. गेल्या तीन वर्षापासून नासाका बंद असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याने जंगलसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. बिबट्याच्या दर्शनानंतर रात्रभर परिसरात कुत्रे भुंकत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे बुधवारी सकाळपासून ग्रामस्थ व आजूबाजूच्या मळ्यातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी नानेगाव, वडगाव, मुठाळ वस्ती आदि भागामध्ये बिबट्याने गोठ्यातील व घराबाहेर बांधलेल्या जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: The sight of the leopard in the area of ​​NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.