कॉलेजरोडवर सिग्नल कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:38 AM2019-02-06T01:38:34+5:302019-02-06T01:39:17+5:30

कॉलेजरोडवरील वाहतुकीवर नियंत्रण रहावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महापालिकेच्या वतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या सूचनेवरून प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्र्णी चौकामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

The signal on the collageboard implemented | कॉलेजरोडवर सिग्नल कार्यान्वित

सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन करताना मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल़ समवेत योगेश हिरे, समीर कांबळे, हेमलता पाटील, अजय बोरस्ते, हिमगौरी आडके आदी़

Next
ठळक मुद्देकोंडी फुटणार : सुसाट वेगाला ‘ब्रेक’; सिग्नल पालनाचे आवाहन

नाशिक : कॉलेजरोडवरील वाहतुकीवर नियंत्रण रहावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महापालिकेच्या वतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या सूचनेवरून प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्र्णी चौकामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे व पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला.
कॉलेजरोडवरील कुलकर्णी चौक दिवसेंदिवस अपघाताचा केंद्रबिंदू बनत चालला होता. या चौकात कृषिनगर-गंगापूररोडला जोडणारे रस्ते एकत्र येतात. मॉडेल कॉलनी चौकाप्रमाणेच हा चौकदेखील वर्दळीचे ठिकाण बनल्याने येथे सिग्नल बसविण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.

Web Title: The signal on the collageboard implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.