सिग्नलवर नाशिककरांकडून वाहनांचे इंजिन होताहेत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:17 AM2018-09-18T01:17:06+5:302018-09-18T01:17:52+5:30

‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नलवर बहुतांश दुचाकीस्वारांसह चारचाकीचालकदेखील आता ‘ग्रीन’ सिग्नल मिळेपर्यंत वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.

The signal is stopped from the vehicles of Nashik vehicles | सिग्नलवर नाशिककरांकडून वाहनांचे इंजिन होताहेत बंद

सिग्नलवर नाशिककरांकडून वाहनांचे इंजिन होताहेत बंद

Next

नाशिक : ‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नलवर बहुतांश दुचाकीस्वारांसह चारचाकीचालकदेखील आता ‘ग्रीन’ सिग्नल मिळेपर्यंत वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.  पेट्रोल दरवाढीचा भडका कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील पेट्रोलपंपांवर गरजेपुरतेच पेट्रोल वाहनांच्या टाकीत भरताना नागरिक दिसून येत आहेत. दररोज लागेल तेवढेच पेट्रोल भरायचे, असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. तसेच गरजेच्या वेळीच वाहनाचा वापर करण्याचा प्रयत्नही नागरिक करत आहे. एकू णच पेट्रोलची बचत कशी होईल, यादृष्टीने नागरिक प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. कारण विरोधी पक्षांनी एकत्र येत देशभर इंधनदरवाढीविरोधात एल्गार पुकारल्यानंतरही दरवाढीवर सरकारकडून कुठल्याही प्रकारे नियंत्रण आणण्यात आलेले नाही. याउलट देशभर मोर्चाची लाट उसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेट्रोल दर शंभरीला भिडले. त्यामुळे सत्ताधारी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जातील, अशी भोळीभाबडी आशादेखील संपुष्टात आली असून दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचा तसेच जीवनावश्यक घटक असलेल्या पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी होतील यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही.  दरवाढीमुळे नागरिकांनी आता बचतीवर लक्ष केंद्रित केले आहे. जितका शक्य होईल तितका वाहनाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करताना नाशिककर दिसत आहे. तसेच रस्त्यावरून प्रवास करताना शहरातील विविध सिग्नलवर वाहनचालकांकडून वाहनांचे इंजिन स्वयंस्फूर्तीने बंद करण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेषत: महिला वाहनचालक याबाबत अधिक खबरदारी घेत असून त्यांच्याकडे स्वयंपाकघरातील गणित जुळविण्याचा अनुभव असल्याने महिला वाहनचालक अत्यंत काटेकोरपणे पेट्रोलची बचत करण्यावर भर देत आहेत. सिग्नलवर थांबताना वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.
संध्याकाळी पेट्रोलपंपांवर शुकशुकाट
पेट्रोलच्या दरवाढीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. परिणामी संध्याकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेतही शहरातील त्र्यंबक नाका, गंगापूररोड, पंचवटी, निमाणी, नाशिकरोड, सातपूर-त्र्यंबक रस्ता आदी ठिकाणांच्या पेट्रोलपंपांवर शुकशुकाट बघावयास मिळाला. संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान बहुतांश पंपांवर पेट्रोल डिलिव्हरी करणा-या कर्मचाºयांना वाहनांची प्रतीक्षा करावी लागत होती.
पेट्रोल दरात तफावत
दराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण संकेतस्थळासह पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनकडून जाहीर होणारे दैनंदिन पेट्रोल-डिझेलचे दर आणि प्रत्यक्षात शहरातील विविध पेट्रोलपंपांवर केली जाणाºया दर आकारणीमध्ये तफावत आढळून येत आहे. ८९.८७ रुपये असा दर सोमवारी जाहीर केला असला तरी बहुतांश पेट्रोलपंपांवर ८९.८९ किंवा ८९.९० रुपये असा आकारण्यात आला. त्यामुळे पेट्रोलपंपांवर वाद-विवादाचे प्रसंगही घडले.

Web Title: The signal is stopped from the vehicles of Nashik vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.