सिग्नल यंत्रणा बनली शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:25 PM2020-07-22T23:25:54+5:302020-07-23T00:55:04+5:30
कलानगर येथील राजे छत्रपती चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र शहर वाहतूक पोलीस विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ती शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.
इंदिरानगर : कलानगर येथील राजे छत्रपती चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र शहर वाहतूक पोलीस विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ती शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.
सुमारे १२ वर्षांपूर्वी वडाळा नाका ते पाथर्डी गाव हा रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यालगत विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, सराफनगर, पांडवनगरी, शरयूनगर, कैलासनगरसह विविध उपनगरे आहेत. त्याशिवाय अंबड औद्योगिक वसाहत, पुणे व मुंबई महामार्गास जवळचा रस्ता असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. कलानगर येथील राजे छत्रपती चौकात राजीवनगर झोपडपट्टीमार्गे मुंबई महामार्ग, वडाळा-पाथर्डी रस्ता व वडाळा गाव मार्गे पुणे महामार्ग असे तीन मुख्य रस्ते एकत्र येतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. तसेच दररोज होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांची जणू काही मालिका सुरू झाली होती. त्याची दखल घेत महापालिकेने या चौकात सिग्नल यंत्रणा मंजूर केली. चार महिन्यांपूर्वी यंत्रणा बसविण्यात आली; परंतु अद्यापपर्यंत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यास मुहूर्त लागला नाही. सिग्नल सुरू करावेत अशी मागणी होत आहे.