क्रीडा विद्यापीठासाठी स्वाक्षरी मोहीम

By admin | Published: August 30, 2016 01:12 AM2016-08-30T01:12:11+5:302016-08-30T01:49:34+5:30

संघटना, शिक्षकांचा सहभाग : ‘अध्यापक भारती’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Signature campaign for Sports University | क्रीडा विद्यापीठासाठी स्वाक्षरी मोहीम

क्रीडा विद्यापीठासाठी स्वाक्षरी मोहीम

Next

नाशिक : केंद्र व राज्य सरकारने क्रीडाक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय व राज्यपातळीवर क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी अध्यापक भारती संस्थेतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनाच्या निमित्ताने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सुमारे बाराशेहून अधिक क्रीडापे्रमींनी प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासनाने २००२ मध्ये घोषित के लेले क्रीडा धोरण अंमलात आणावे व आॅलिम्पिक स्पर्धांच्या धर्तीवर प्रत्येक दोन वर्षांनंतर मिनी आॅलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची मागणी अध्यापक भारतीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा प्रबोधिनीची प्रवेश क्षमता वाढवावी, शाळा-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांसाठी आर्थिक तरतुदीत वाढ करावी, विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब कष्टकरी वर्गातील क्रीडापटूंच्या शासनाने दत्तक घेऊन त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी उचलावी, क्रीडाक्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप बंद करावा, विविध स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड व खेळाडूंच्या शासकीय नोकरीतील नियुक्ती पारदर्शक पद्धतीने व्हावी. तालुका व जिल्हास्तरावर निवासी क्रीडा विद्यालय स्थापन करावे आदि मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. त्याच्रमाणे अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी संख्येप्रमाणे शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणीही अध्यापक भारतीने केली आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरद शेजवळ, विनोद पानसरे, समाधान पगारे, अखिल गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Signature campaign for Sports University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.