विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:01 AM2018-07-01T01:01:26+5:302018-07-01T01:01:40+5:30

परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस गजानन महाराज रस्त्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 Signature campaign to underground electric star | विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

Next

इंदिरानगर : परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस गजानन महाराज रस्त्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अद्याप पावसाने पाहिजे तसा जोर धरला नाही तरी अशी परिस्थिती आहे जर पावसाने जोर धरला तर काय होणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला
आहे. कमोदनगर, शास्त्रीनगर, दीपालीनगर, सूचितानगर, राजीवनगर, चेतनानगर, आदर्श कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, श्रद्धाविहार कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, परबनगर यांसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाच ते सहा तास वीजपुरवठा वारंवार खंडित होत
विजेचा लपंडाव
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दिवसभरातून अनेक वेळेस वीजपुरठा खंडित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या वारंवार लपंडावामुळे विद्युत उपकरण नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. परिसरातील त्रस्त नागरिकांनी विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

Web Title:  Signature campaign to underground electric star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज