वयोवृद्ध महिलांना अक्षरओळख करून शिकविली सही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 11:32 PM2022-02-05T23:32:29+5:302022-02-05T23:33:53+5:30

सटाणा : इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन मार्फत जागतिक इनरव्हिल डे निमित्त विविध कार्यक्रमाबरोबरच वयोवृद्ध महिलांना अंक आणि अक्षरओळख करून त्यांना सही करण्यास शिकविले.

Signature taught to older women by literacy | वयोवृद्ध महिलांना अक्षरओळख करून शिकविली सही

वयोवृद्ध महिलांना अक्षरओळख करून शिकविली सही

Next
ठळक मुद्देयावेळी किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.

सटाणा : इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन मार्फत जागतिक इनरव्हिल डे निमित्त विविध कार्यक्रमाबरोबरच वयोवृद्ध महिलांना अंक आणि अक्षरओळख करून त्यांना सही करण्यास शिकविले.
यावेळी किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. तसेच पुणे येथील दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या रेड डॉट बॅग वाटून मासिक पाळीविषयी माजी अध्यक्ष रूपाली जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर वयोवृद्ध महिलांना अंक आणि अक्षरओळख करून सही करण्यास शिकविले.

यावेळी महिलांना लेखन साहित्य, गरजूंना स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी मीनाक्षी जाधव, सरला जाधव, रूपाली कोठावदे, स्मिता येवला, रेखा वाघ, नयना कोठावदे, पूजा दंडगव्हाळ, आदी उपस्थित होते. 

Web Title: Signature taught to older women by literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.