मुलींच्या जन्मदरात लक्षणीय घट

By admin | Published: July 20, 2016 10:33 PM2016-07-20T22:33:12+5:302016-07-20T22:48:17+5:30

मुलींच्या जन्मदरात लक्षणीय घट

Significant decline in girl child birth | मुलींच्या जन्मदरात लक्षणीय घट

मुलींच्या जन्मदरात लक्षणीय घट

Next

 मालेगाव : आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून चिंताजनक बाब स्पष्टकिशोर इंदोरकर ल्ल मालेगाव कॅम्प
मालेगाव शहरासह तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शहरात शासनातर्फे प्रबोधन करण्याची गरज आहे.
गेल्या दहा वर्षात हजार मुलांच्या जन्मदरापेक्षा मुलींचा जन्मदर वीस ते पंचवीस टक्के कमी आहे. २००७ मध्ये शहरात ९०६८ मुले, ८४२५ मुली तर ग्रामीण भागात ४२१४ मुले, ४१४३ मुली असे प्रमाण होते. मालेगाव शहरात ६४३ मुलींची, तर ग्रामीण भागात ७१ मुलींची नोंद आढळल्याने तालुक्यातील मुलींच्या जन्मदरातील घट दिसून येते.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीवरून गेल्या २००२ पासून मार्च २०१६ व चौदा वर्षात मुलांच्या आकडेवारीपेक्षा मुलींचा आकडा एक ते दोन हजारने कमी असल्याचे दर्शवितो. आरोग्य विभाग व इतर यंत्रणांवर मुलीच्या जन्मदराबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ‘बेटी बचाव’ अभियान शहरात राबविले पाहिजे. शहरात काही वर्षांपूर्वी सोनोग्राफी सेंटरमध्ये लिंगनिदान चाचणी केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. लिंग निदान चाचणी, स्त्री भ्रूणहत्त्या केल्यास मोठ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, असे फलक प्रत्येक सोनोग्राफी सेंटरमध्ये लावलेले आहेत. त्यावर किती कारवाई होते हे गुलदस्त्यात आहे. मालेगाव तालुक्यातील मुले-मुली जन्मदरांचे आकडेवारी चिंता करायला लावणारी आहे. शहरात लिंगनिदान चाचणी होत नाही. शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ व सोनोग्राफी सेंटरचे तज्ज्ञ याबाबत अशा कुठल्याही गोष्टी आम्ही आमच्या सेंटरमध्ये अथवा हॉस्पिटल-मध्ये करीत नाही, असे ठामपणे सांगत असले तरीही शहर व तालुक्यातील मुलींचा जन्मदराचा आकडा काळजी करायला लावणारा आहे.

Web Title: Significant decline in girl child birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.