दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 07:24 PM2020-09-05T19:24:42+5:302020-09-06T00:46:28+5:30

दिंडोरी : तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७१ टक्के पाणीसाठा झाला असून पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे ओझरखेड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊ धरण ६०.८५ टक्के इतके भरले आहे.

Significant increase in stocks of heavy rain dams in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ

दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ

Next
ठळक मुद्दे पुणेगाव धरण भरले उनंदा नदीपात्रात पाण्याचा विसंर्ग

दिंडोरी : तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७१ टक्के पाणीसाठा झाला असून पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे ओझरखेड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊ धरण ६०.८५ टक्के इतके भरले आहे.
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागांमध्ये शुक्र वारी (दि.४) रात्री १० वाजता जोरदार पाऊस पडल्यामुळे करंजवण धरणामध्ये एकाच दिवशी ७ टक्के पाणी वाढल्याने करंजवण धरणाचा पाणीसाठा ७५.०२ इतका पाणीसाठा झाला आहे. तर पालखेड धरण ८८ टक्के भरले असून या धरणाचे पाणी कॅनालद्वारे सोडण्यात आले आहे.
वाघाड धरणाचा पाणीसाठा ८०.५२ टक्के इतका झाला असून सर्वात कमी म्हणजे २७.६० टक्के पाणीसाठा तीसगाव धरणाचा आहे. दिंडोरी तालुक्यात तीसगाव धरण वगळता सर्व धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात एकूण ७५६ मिमी पावसाने सरासरी गाठली आहे.
दिंडोरी तालुक्यातील सात विभागापैकी आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस ननाशी विभाग (१२७८ मिमी) पडला असून वरखेडा विभागात (१०१०.०१), कोशिंबे विभागात (८०४.१), उमराळे विभाग(७१५.०), वणी विभाग (५८६.०), दिंडोरी विभाग(५०७.०) तर सर्वात कमी पाऊस मोहाडी विभाग(३९५.०) इतका झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. तसेच हवामान तज्ञांकडून अजून पाऊस पडणार असल्यांचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Significant increase in stocks of heavy rain dams in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.