सिन्नरच्या नऊ प्रेरकांकडून देवळ्यात मुल्यवर्धनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:41 PM2019-08-20T17:41:58+5:302019-08-20T17:42:13+5:30
सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले.
सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. एस. सी. आर. टी. पुणे व शांतिलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण जिल्हा स्तरावरून आयोजित करण्यात आले होते.
सिन्नर तालुक्यातील ज्या नऊ शाळेत उत्कृष्टपणे मूल्यवर्धन उपक्रम राबवला अशा ठिकाणच्या नऊ शिक्षकांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून देवळा तालुक्यात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. मुल्यवर्धन ही काळाची गरज असून तो अभ्यासक्रमाचा भाग आहे. येणारी पिढी सुजाण नागरिक म्हणून निर्माण व्हावी, हा हेतू ठेवून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांवर मुल्य रूजवणे आवश्यक आहे. विविध उपक्र म, खेळ, गोष्टी, अध्यापन पद्धती व कृती यांच्या माध्यमातून मूल्यवर्धित अभ्यासक्रम शासनाने तयार केला आहे. त्याद्वारे प्रशिक्षण दिलेले शिक्षक आपल्या वर्गात व शाळेत हा उपक्र म राबवणार आहेत. संगीता महिरे, संजय खरात, गोरक्ष सोनवणे, अश्विनी पाटील, भानुदास बेनके, रवींद्र सातव, कविता लोहार, भारत कापडणीस, राजेंद्र कोकाटे या नऊ प्रेरकांनी अनुक्र मे पिंपळगाव, देवळा, उमराणे, लोहणरे या बीटातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमाचे धडे दिले. प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल नाशिकच्या अधिव्याख्यात्या डॉ. भारती बेलन, देवळाचे गट शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, विस्तार अधिकारी एस. जी. बच्छाव, विजया फलके, नंदकुमार देवरे, किरण विसावे, केंद्रप्रमुख शिरीष पवार, दिलीप पाटील, रावबा मोरे, जयश्री पवार, संजय ब्राम्हणकार, घनश्याम बैरागी, मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक जगन्नाथ सोनटक्के, विजय धनवे, तालुका समन्वयक अतुल पवार, शरद थोरात, मुश्ताक शेख आदींनी सिन्नर टीमचे आभार मानले.