सिन्नर तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची महत्त्वूपर्ण भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:47 PM2018-11-15T17:47:01+5:302018-11-15T17:47:17+5:30
सिन्नर : शिवसरस्वतीने राबविलेल्या कुपोषण निमुर्लन अभियानाच्या यशात खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही अशाच प्रकारे काम करून पुढील सहा महिन्यात उर्वरित २५२ बालके कुपोषणातून बाहेर काढून तालुका कुपोषण मुक्त करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांनी केले.
सिन्नर : शिवसरस्वतीने राबविलेल्या कुपोषण निमुर्लन अभियानाच्या यशात खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही अशाच प्रकारे काम करून पुढील सहा महिन्यात उर्वरित २५२ बालके कुपोषणातून बाहेर काढून तालुका कुपोषण मुक्त करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांनी केले.
फेब्रुवारी महिन्यातील शासकीय आकडेवारी नुसार तीव्र श्रेणीत ६९ कुपोषित मुले शिवसरस्वती फाउंडेशनने दत्तक घेतली. मात्र मे महिन्यात हा आकडा चुकीचा असल्याचे उघड झाले व बालकांची संख्या ११३० वर पोहचली. फेब्रुवारीपासून हाती घेतलेल्या संस्थेच्या कुपोषण निर्मूलनाच्या अभियानात आरोग्य, महिला बाल कल्याण विभागाने अथक परिश्रम घेऊन ग्राम बालविकास केंद्रांच्या माध्यमातून ही संख्या २५२ वर आणली असल्याचे कोकाटे म्हणाल्या.
बालदिनानिमित्त शिवसरस्वती फाउंडेशन आयोजित कुपोषण निर्मूलन जागृती अभियान या कार्यक्रमात सीमंतिनी कोकाटे बोलत होत्या. व्यासपीठावर गटविकास अधिकारी लता गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी रत्नाकर पगार, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय गिरी, प्रकल्प अधिकारी गोरख शेवाळे, पर्यवेक्षक लता गवळी, ए. टी. राऊत आदी उपस्थित होते.
कुपोषण मुक्तीसाठी अथक परिश्रम अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभत असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहेत. मात्र कुपोषणाच्या बाबत पालक अनभीज्ञ असल्याने त्यांचे सहकार्य लाभत नाही, त्यासाठी व्यापक जनजागृती असणे अपेक्षित असल्याने कुपोषित बालक, त्यांचे पालक, सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्या साठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. लहान मुले ही उद्याचे भविष्य आहे अन उद्याचे भविष्य जर सुदृढ व सक्षम करायचे असेल तर पालकांचे व पदाधिकाºयांचे सहकार्य अपेक्षित आहे. मी हे काम अंगणवाडी सेवकांच्या विरोधात करत नसून तुम्ही व मी मिळून ही सामाजिक जबाबदारी तडीस नेवू. त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका उत्तम काम करतील त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात येईल असे प्रतिपादन कोकाटे यांनी यावेळी केले.