बेमोसमी पावसाने फळबागांचे नुकसान होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 PM2020-12-15T16:33:51+5:302020-12-15T16:34:30+5:30

पेठ : गत आठवड्यात तालुक्यात झालेल्या बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे फळबागांसह वेलवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची चिन्हे दिसत असून केवडा व करपा रोगाचा प्रार्दूभाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Signs of damage to orchards due to unseasonal rains | बेमोसमी पावसाने फळबागांचे नुकसान होण्याची चिन्हे

बेमोसमी पावसाने फळबागांचे नुकसान होण्याची चिन्हे

Next

पेठ तालुक्यात जवळपास ११९७ हेक्टरवर केशर व इतर जातीच्या आंब्यांची लागवड करण्यात आली असून वातावरणातील बदलामुळे मोहोर गळून पडण्याची भिती व्यक्त होत आहे. बेमोसमी पावसामुळे २६२ हेक्टर वरील काजूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पावसाळी पिकांनंतर तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर वेलवर्गीय पिकांची लागवड करतात. त्यामध्ये भोपळा, वाल,कारले, गिलके, टमाटे यांचे उत्पादन घेतले जाते मात्र ऐन उत्पादनाच्या वेळी बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Signs of damage to orchards due to unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.