लोकसभा निवडणुकीनंतर  त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत : सुरेश भटेवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:06 AM2019-04-22T01:06:08+5:302019-04-22T01:06:40+5:30

यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.

 Signs of hunger government after Lok Sabha elections: Suresh Bhatevara | लोकसभा निवडणुकीनंतर  त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत : सुरेश भटेवरा

लोकसभा निवडणुकीनंतर  त्रिशंकू सरकार येण्याचे संकेत : सुरेश भटेवरा

Next

नाशिक : यंदाच्या निवडणुकीत भाजपासोबतच कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याने सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू सरकार सत्तेवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी वर्तवले आहे.
कुसुमाग्रज स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत मानव उत्थान मंचतर्फे अंतर्गत ६४ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी ‘लोकसभा निवडणुकीचे अंतरंग’ या विषयावर बोलताना त्यांनी देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचे सांगतानाच निवडणुकीत विकासाचे मुद्दे नसून त्याऐवजी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक असे विषय पुढे आणले जात असल्याचे अधोरेखित केले. गेल्या पंचवार्षिकमध्ये २०१४ पेक्षा आता परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणात आता पूर्वीसारखा आवेश नसून ते बचावात्मक पवित्र्यात दिसत आहे. सरकारचे परराष्ट्र धोरणही कुचकामी ठरत असून, मागील पाच वर्षांत पंतप्रधानांनी ८६ देशांचे दौरे केले, पण त्यातून भारताला काही लाभ झाल्याचे वाटत नाही. बांगलादेश, श्रीलंका यांसारखे पारंपरिक शेजारी देश आपल्यापासून दुरावले. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. उद्योगधंदे, बँकिंग क्षेत्र अडचणीत आले असून बेरोजगारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एनडीएला २२५ पर्यंतच मजल मारणे शक्य होणार असून, बिजू जनता दल, एआयएडीएमके, तेलगू देसम, वायएसआर पक्ष, टीआरएस यांनी मदत केल्यास एनडीएला पुन्हा देशात सत्ता मिळवता येईल. तर काँग्रेसचीही अशीच स्थिती असून, त्यांनाही बहुमताचा आकडा मिळवणे कठीणच आहे. त्यांच्याकडे किंगमेकरची भूमिका राहू शकते. मात्र कोणत्याही स्थितीत एकाच पक्षाच्या हाती संपूर्ण सत्ता मिळणे यावेळी कठीण असल्याचे मत सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले. शामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. घिया यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title:  Signs of hunger government after Lok Sabha elections: Suresh Bhatevara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.