जमिनीच्या सुपीकतेचा निर्देशांक दर्शविणारे फलक लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:53+5:302020-12-06T04:15:53+5:30
जागतिक मृदा दिनानिमित्त तालुक्यातील खडकी येथील सुळेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात भुसे बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार ...
जागतिक मृदा दिनानिमित्त तालुक्यातील खडकी येथील सुळेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात भुसे बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, शास्त्रज्ञ रामदास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण शिंदे, दीपक मालपुरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, शास्त्रज्ञ रामदास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तर तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांनी आभार मानले.
इन्फो
कृषी योजनांचा लाभ देणार
भुसे म्हणाले, जमिनीच्या आरोग्यपत्रिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत, त्यावरून गावनिहाय जमिनीच्या सुपीकतेचा निर्देशांक दर्शविणारे फलक राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दर्शनी भागावर लावण्यात येणार आहेत. त्यात नमूद केलेल्या प्रमाणात खतांची मात्रा देणे शेतकऱ्यांना सुलभ होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार यापुढे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याने शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांची व्याप्ती वाढविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.