भाजपात मोठे संघटनात्मक फेरबदलाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:25+5:302021-02-11T04:17:25+5:30
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात संघटनात्मक बदलांच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषत: माजी मंत्री व जिल्हा प्रभारी ...
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात संघटनात्मक बदलांच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषत: माजी मंत्री व जिल्हा प्रभारी जयकुमार रावल यांनी शहरात येऊन नगरसेवकांची मते अजमावून घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत हेाणार आहे.
महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. परंतु भरीव कामे झाल्याचे दावे झाल्याचे एकीकडे पदाधिकारी सांगतात, दुसरीकडे मात्र प्रभागात कामेच झालेली नाहीत, अशाप्रकारच्याही तक्रारी आहेत. यासंदर्भात पक्षाचे जिल्हा प्रभारी जयकुमार रावल यांनी नाशिकमध्ये येऊन वसंत स्मृती येथे नगरसेवकांना बेालावून ऐककाशी बंद खेालीत चर्चा केली. कोणताही पदाधिकारी यावेळी उपस्थित नसल्याने नगरसेवकांना मेाकळेपणाने मते मांडता आली. त्यातही कामांबरोबच संघटनात्मक तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात होत्या. विशेषत: संघटनेतील जुन्याजाणत्यांना डावलणे, महापालिकेतील ठेकेदारी, पक्षाच्या शहराध्यक्षांच्या महापालिकेतील ठेकेदारीशी संबंध आणि ठेकेदार कंपनीचा दंड माफ करण्यासाठी सुरू असलेली धावपळ अशा अनेक प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या. राज्यातील सत्ता जाण्यामागे पक्षातील निष्ठावंत नाराज झाल्याचे कारण पुढे आहेच, मात्र महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी पक्षातील निष्ठावंतांना न्याय द्या, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्याचे समजते. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक गटाने देखील माेकळ्या मनाने अनेक व्यथा मांडल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पक्ष नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर रावल यांनी जाहीरिरत्या काही गोष्टी बोलून दाखवल्या. परंतु पक्षश्रेष्ठींकडे याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने मुंबईत कोअर कमिटीची बैठक बेालावली होती. कोअर कमिटीच्या सदस्य असलेल्या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे उपलब्ध नसल्याने ही बैठक टळली असली, तरी आताही बैठक येत्या एक ते दोन दिवसात होणार असल्याचे वृत्त आहे.
इन्फो..
नाशिक महापालिकेत नगरसेवकांनी कोणती कामे केलीत, त्यात वेगळेपण असलेला प्रकल्प कोणता, याबाबत नगरसेवकांकडे पुन्हा एकदा जयकुमार रावल यांनी माहिती मागवली आहे.