वाकी खापरी धरण विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:49 PM2017-12-21T12:49:11+5:302017-12-21T12:49:32+5:30
घोटी - इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली बु गावचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने वाटप केलेल्या भूखंडात घोळ झाला असल्याचा आरोप विस्थापितांनी करीत, शासनाने पुन्हा भूखंड वाटपाची प्रक्रि या राबवावी या मागणीसाठी येत्या प्रजासत्ताकदिनी धरणावर बेमुद्दत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन विस्थापितानी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात भावली बु हे गाव गेलेले आहे. शासनाने या संपूर्ण गावचे सुरिक्षतस्थळी पुनर्वसन करण्याचे निश्चित केले आहे.यानुसार नवीन घरे बांधण्यासाठी पुनर्वसित ठिकाणी भूखंड वाटप करण्यात येत आहे. मात्र भूखंड वाटप करताना भेदभाव करून दलित आण िआदिवासीचे विभाजन करून त्यांना खड्ड्यात जागा देण्यात आल्याने या विस्थापितानी जागा ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.तसेच कमी सदस्य संख्या असणाºया कुटुंबाना मोठ्या आकाराची जागा व जास्त सदस्य असणार्या कुटुंबाना कमी जागेचे वाटप करण्यात आले आहे. याचबरोबर बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा मोबदला देण्यात ही दुजाभाव झाला असून,पक्की घरे असणार्या विस्थापिताना कमी मोबदला आणि कच्ची घरे असणाºयांना अधिक मोबदला देण्यात आला असल्याने या विस्थापितात नाराजी आहे. दरम्यान, पुन्हा भूखंड वाटपासाठी ग्रामसभेचे पुन्हा आयोजन करावे अशी मागणी या विस्थापितांनी करूनही दखल घेतली नसल्याने अखेर या विस्थापितांनी येत्या प्रजासत्ताक दिनी धरणावर कुटुंबासोबत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत या विस्थापिताच्या शिष्टमंडळाने उपविभागीय आयुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या शिष्टमंडळात संजय शिंदे, भास्कर पाचरणे, नंदू पेडेकर, भगवान पाचरणे, कचरू पाचरणे, तुकाराम शिंदे, शांताराम बच्चे, अरु ण बच्चे, संपत काळचिडे, काळू सराई, त्र्यंबक खाडे, भावडू काळचिडे, शिवाजी खाडे आदींचा समावेश होता.