‘पिवळे सोनं’ काळवंडण्याची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:46 PM2020-02-22T22:46:59+5:302020-02-23T00:24:41+5:30

कोरोना व्हायरसच्या धसक्याने पोल्ट्री उत्पादकांकडून मका पिकास मागणी कमी झाली आणि उन्हाळ मक्याचे उत्पादन वाढल्याने मक्याच्या दरात घसरण होत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पिवळे सोने फिके पडले असून, पुढील भवितव्य धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Signs of 'yellow gold' blackout | ‘पिवळे सोनं’ काळवंडण्याची चिन्हे !

‘पिवळे सोनं’ काळवंडण्याची चिन्हे !

Next
ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम । हमीभाव मिळत नसल्याने मका उत्पादक चिंतित

येवला : कोरोना व्हायरसच्या धसक्याने पोल्ट्री उत्पादकांकडून मका पिकास मागणी कमी झाली आणि उन्हाळ मक्याचे उत्पादन वाढल्याने मक्याच्या दरात घसरण होत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पिवळे सोने फिके पडले असून, पुढील भवितव्य धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
मक्याचे दर प्रतिक्विंटल २२०० पासून १४०० वर आले आहेत. नजीकच्या काळात आणखी हे सोनं काळवंडणार नाही याची काळजी शासनस्तरावर घ्यावी व मक्यास हमीभाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. फेडरेशनद्वारा खरेदी विक्र ी संघामार्फत हमीभावाने मक्याची खरेदी करावी. येवल्यासह सभोवतालचा परिसर मक्याचे मोठे आगर आहे. तालुक्याचे हे नगदी पीक आहे. येवला तालुक्यासह परिसरात शेतकरी कांद्यानंतरचे नगदी पीक म्हणून मका पिकास शेतकरी प्राधान्य देतात.
सध्या मका भाव प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रु पयाने घसरले आहे. त्यामुळे मुळातच अडचणीत असलेला शेतकरी मक्याचे दर कमी झाल्याने चिंतित आहे. कोरोना व्हायरसमुळे मका निर्यात थंडावली आहे. याशिवाय केंद्र शासनाने मका मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आल्याची चर्चा शेतकरी करीत आहे.

शासनस्तराहून उपाययोजना करण्याची मागणी : कुकुटपालन व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकरी शासनाकडे आधारभूत किंमत मागणी करीत आहेत. खरीप हंगामातील मक्याचे दर व उन्हाळा कांदा रोपांची कमतरता यामुळे यंदा रब्बीतही मक्याचे बंपर पीक येण्याची शक्यता आहे. शेती आणि शेतकरी धोक्यात येऊ नये, यासाठी शासनस्तराहून गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

मक्याचे दर धोक्यात आले तर शासनाने हमीभाव द्यावा व खरेदी करावी. किमान २२०० रु पये प्रतिक्विंटल दर द्यावा. अन्यथा शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत जातील. शेती व्यवसाय आता करावा की नाही याची चिंता आहे. अस्मानी आणि सुलमानी संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, पिकांना हमीभाव मिळणे गरजेचे आहे.
- सुदाम माळी, मका उत्पादक शेतकरी

Web Title: Signs of 'yellow gold' blackout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.