वणीत सर्वत्र शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:44 PM2020-03-22T22:44:43+5:302020-03-22T22:46:02+5:30

वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणीत नागरिकांनी १०० टक्के बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पहाटे पाच वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी शहरात दोन घंटागाड्या ग्रामपालिकेने कार्यरत केल्या आहेत. प्रतिदिन या घंटागाड्या दुपारी बारा वाजेपर्यंत कचरा उचलून शहराबाहेर टाकतात. दरम्यान, त्यात कोणताही खंड न पडता नऊ कर्मचाºयांनी कचरा उचलला.

Silence everywhere | वणीत सर्वत्र शांतता

वणीत सर्वत्र शांतता

Next
ठळक मुद्देकचरा उचलण्यासाठी शहरात दोन घंटागाड्या ग्रामपालिकेने कार्यरत

वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणीत नागरिकांनी १०० टक्के बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पहाटे पाच वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी शहरात दोन घंटागाड्या ग्रामपालिकेने कार्यरत केल्या आहेत. प्रतिदिन या घंटागाड्या दुपारी बारा वाजेपर्यंत कचरा उचलून शहराबाहेर टाकतात. दरम्यान, त्यात कोणताही खंड न पडता नऊ कर्मचाºयांनी कचरा उचलला.
बंद काळात घरात बसलेल्या नागरिकांनी न्यूज चॅनल पाहणे, कॅरम, चेस, पत्त्यांचे विविध खेळ खेळण्यात वेळ घालविला तर युवकवर्ग भ्रमणध्वनीवर चित्रपट पाहण्यात तर लहान मुले गेम खेळून मनोरंजन करीत होते. शासकीय आदेशाची पायमल्ली करणाºया व्यावसायिकांच्या दुकानांचे फोटो व नावे पथकाने त्याची नोंद केली आहे.पाच जणांची तपासणीपरदेशातून आलेल्या पाच जणांची विमानतळवर तपासणी करण्यात आली. ते पाचही जण सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तसेच उर्वरीत चार व्यक्तीची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल एस साबळे यांनी केली असुन कोणत्याही प्रकारचे संभाव्य लक्षणे आढळुन आलेली नाहीत. खबरदारी म्हणुन क्वोरोंटाईन घरातच राहण्याचा सल्ला दिल्याची माहीती साबळे यांनी दिली.वणी नाशिक रस्त्यावरील शुकशुकाट.

Web Title: Silence everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.