बियाणी हत्येच्या निषेधार्थ ओझरला मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 11:07 PM2022-04-07T23:07:30+5:302022-04-07T23:08:28+5:30

ओझर : नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्याच्या निषेधार्थ ओझर राजस्थानी समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून मूकमोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

Silence on Ozar to protest seed killing | बियाणी हत्येच्या निषेधार्थ ओझरला मूकमोर्चा

संजय बियाणी हत्येच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांना निवेदन देताना ओझर राजस्थानी समाज.

Next
ठळक मुद्देओझर : राजस्थानी समाजाचा शहरातून मूकमोर्चा काढून निवेदन

ओझर : नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्याच्या निषेधार्थ ओझर राजस्थानी समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून मूकमोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

नांदेड येथील समाजभूषण असलेले बियाणी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याचे पडसाद राज्यभर उमटू लागले असता ओझर येथील राजस्थानी समाजातर्फे गावातून मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. बालाजी मंदिर, शिवाजी रोड, मेनरोडमार्गे ओझर पोलीस चौकी येथे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांना, तर राज्य शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष प्रवीण लढ्ढा, सचिव मुकुंद जाजू, ओमकोचे संचालक रवींद्र भट्टड, रामेश्वर लढ्ढा, प्रकाश चोपडा, सुनील बाफना, संजय सारडा, संतोष लढ्ढा, नंदलाल नावंदर, संजय लढ्ढा, विनोद चांडक, मोहन ब्यास, बाळकृष्ण जाजू, जयप्रकाश भट्टड, दादा चांडक, अशोक कासलीवाल, योगेश जाजू, पूनम कोचर, श्यामसुंदर भट्टड, भेरुलाल माहेश्वरी, अजय मुंदडा, अनिल राठी, सुभाष भट्टड, सोनल लोया, राजेंद्र भुतडा, धनंजय भट्टड, रोहित सारडा, योगेश लढ्ढा, वेणुगोपाल धूत आदींसह महिलांनी मोठ्या संख्येने मूकमोर्चात सहभाग घेत निषेध व्यक्त केला.
 

Web Title: Silence on Ozar to protest seed killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.