देवळालीत मोकाट जनावरे सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:57 PM2019-09-18T23:57:44+5:302019-09-18T23:58:04+5:30
लॅमरोडसह देवळालीच्या विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. प्रशासनाकडून या जनावरांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लामरोड भागात वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
देवळाली कॅम्प : लॅमरोडसह देवळालीच्या विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. प्रशासनाकडून या जनावरांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लामरोड भागात वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
आधीच लामरोडवर एका बाजूने भूमिगत गटार योजनेसाठी पाइप टाकण्यात आले त्या ठिकाणी वारंवार रस्ता खचत असल्याने देवळालीकडे जाणारा अर्धाअधिक रस्ता वापरासाठी बंद आहे. त्यामुळे ही जनावरे चाऱ्याच्या आशेने देवळालीकडे येतात. येथील रेस्ट कॅम्प रोड, संसरी नाका, आनंदरोड, रेस्ट कॅम्परोड अशा रस्त्यांवर ठिय्या मांडून बसतात व अचानक रस्त्यावरून उठून चालू लागतात त्यामुळे वाहनचालकी गोंधळ निर्माण होतो. गेल्या वर्षी ही मोकाट जनावरे ताब्यात घेण्याची सुरू करण्यात आलेली मोहीम थंडवल्याने पुन्हा या जनावरांचा त्रास वाढला आहे.
मोकाट जनावरे रस्त्याच्या दुसºया बाजूस बसून वाहतुकीस अडथळा ठरू पाहत आहे. यामुळे रस्त्याने ये-जा करणाºया दुचाकी व चारचाकी वाहनधारक रस्त्यावर बसलेल्या व फिरत असलेल्या या जनावरांकडून होणाºया अडवणुकीमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात पावसामुळे विविध भागांत मोठ्या प्रमाणावर असलेल्या मैदानावर चारा सहज उपलब्ध होतो.